
ब्लॉग खुपच मोठा असल्याने क्रमश https://rateeshri.blogspot.com [ हा ब्लॉग लिहायला मला, ६४ वर्षांच्या माझ्या गुरुजींचे (काका) सहकार्य मिळाले आहे. ते सरकारी नोकरीतुन निमश:त्त आहेत. त्यांनी प्रचंड वाचन केले आहे. घरी स्वतःचे ग्रंथालय आहे थोडा ज्योतिषीय पण अभ्यास आहे , दररोज पुजापाठ करणारे अध्यात्मिक वृत्तीचे उत्तम पुरुष ♂ आहेत.] आमच्या सत्य अनुभवांचे शब्दचित्रन... काका म्हणजे आमचे स्नेही. खुप वर्षांपासून आम्हा दोघांच्या कुटुंबांची ओळख. खरंतर घरोबाच. सरकारी नोकरीतुन रिटायर झाल्यावर ते स्वतंत्र फ्लॅट मध्ये राहतात. मुलगी लग्न करुन अमेरिकेत स्थायिक झाली तर मुलगा येथे पुण्यातच त्याच्या कुटुंबासह रहातो. काही वर्षापुर्वीच काकु देवाघरी गेली, Brain Tumor. काका एक पुस्तक लिहणार होते आणि मदतनीस म्हणुन त्यांना काँप्युटरचे ज्ञान असणारं कोणीतरी हवे होते. टायपींग आणि नोटस् काढण्यासाठी. माझ्या आईला कळाल्यावर आम्ही त्यांना फोन केला होता, माझ्यासाठी नोकरी. बोलावले त्यांनी लगेच भेटायला. दुसऱ्या दिवशीच गेले मी रिक्षाने. गेल्यावर मला पाहुन आनंद झाला त्यांना, किती दिवसांनी पाहतोय त...